पुस्तका सारखा दुसरा मित्र नाही
: पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दादेगाव नवीन येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आकाश भाऊसाहेब ताकवाले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दहिफळे यांनी आपल्या भाषणातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शाळेचे शिक्षक सुनिल बडे, गंगाधर काळे, गुलाब बागवान, प्रकाश ढवळे, मनिषा राख, वैशाली चव्हाण उपस्थित होते आव्हाड, सागर












